कोहिमा: गाडीत शस्त्रास्त्रे, मद्य आणि एक कोटी १० लाख रुपये रोख रक्कम सापडल्याप्रकरणी नागालँडचे गृहमंत्री इमकाँग एल. इम्चेन यांना पोलिसांनी वोखा जिल्ह्यातून सोमवारी ताब्यात घेतले.

कोहिमा: गाडीत शस्त्रास्त्रे, मद्य आणि एक कोटी १० लाख रुपये रोख रक्कम सापडल्याप्रकरणी नागालँडचे गृहमंत्री इमकाँग एल. इम्चेन यांना पोलिसांनी वोखा जिल्ह्यातून सोमवारी ताब्यात घेतले.
इम्चेन कोहिमा येथून मोकोक्चुंगमधील कोरीडंगा या आपल्या मतदारसंघात जात असताना आसाम रायफल्सच्या जवानांनी त्यांच्या बोलेरो गाडीची तपासणी केली असता त्यात पाच पिस्तूल आणि दोन रायफल, मद्य आणि एक कोटी 10 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.
इम्चेन हे कोरीडंगा येथील नागालँड पीपल्स फ्रंट (एनपीएफ) पक्षाचे नेते आहेत. ते मोकोकचुंग जिल्ह्याचे पक्षप्रमुख आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून निवडणूक आयोगानेही याची दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने १६ फेब्रुवारीला एनपीएफचा उमेदवार निमेली फोम यांच्या हेलिकॉप्टरमध्ये एक कोटीची रोकड आढळल्याने खळबळ उडाली होती.