माझेही लैंगिक शोषण झाले होते- अनुष्का शंकर

नवी दिल्ली- सतारवादनाचा वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारी पंडित रवी शंकर यांची मुलगी अनुष्का शंकर हीसुद्धा बालपणी लैंगिक शोषणाची शिकार बनली होती, असे धक्कादायक सत्य तिनेच जगासमोर आणले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सुरू झालेल्या एका मोहिमेत भाग घेताना तिने आपली व्यथा मांडली.

ती पुढे म्हणाली की, व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अनुष्काने एक संदेश दिला आहे. त्यात तिने अरब महिलांना घराबाहेर निघून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. चेंज.ओआरजी या साईटवर तिने संदेश दिला आहे. त्यात तिने स्वतःवर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले. ती म्हणाली, लहानपणी अनेक वर्षांपर्यंत माझे लैंगिक आणि मानसिक शोषण झाले. हे कृत्य अशा व्यक्तीने केले ज्याच्यावर माझ्या आईवडीलांचा प्रचंड विश्‍वास होता. मी बळजबरीने स्पर्श करणे तसेच शिविगाळीचा प्रकार अनेक वर्ष सहन केला आहे. अशा घटना माझ्यासोबत घडल्या की त्यांचा सामना कसा करावा, हेच मला कळत नव्हते. अजूनही मी भीतीच्या सावटाखाली जगत आहे. रात्री एखाद्या पुरुषाने वेळ विचारली तर उत्तर देण्यास मी घाबरते. परंतु, आता मी दिल्ली गँगरेप पीडित तसेच तिच्यासारख्या इतर महिलांसाठी आता जगत आहे.

महिलांनी आता बाहरे पडावे. माझ्यासोबत या, आपण नृत्य करु. कोणत्याही वेदनांवर नृत्य परिणामकारक आहे. वेदना दूर करण्याची अद्भूत शक्ती नृत्यात आहे; असे अनुष्काने सांगितले.

अनुष्काने वन बिलियन रायजींग या मोहिमेसाठी वेबसाईटवर व्हिडीओ मेसेज टाकला आहे. त्यात आपल्या बालपणाच्या काळ्याकुट्ट आठवणी सांगताना तिने तेव्हाची असाहयताही बोलून दाखवली आहे. ती म्हणते, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला लैंगिक आणि शारीरीक शोषणाला सामोरे जावे लागले. अनेक वर्षे माझ्यावर हा अत्याचार झाला. जो नराधम हे कृत्य करत होता तो माझ्या आई-वडीलांच्या विश्वासातला होता. इतर महिलांना जे सहन करावे लागतेय ते मलाही त्यामुळे सहन करावे लागले. काही ना काही कारण काढून माझ्याशी ही व्यक्ती जवळीक करायची. अनेकवेळा असेही प्रकार घडले ज्याबद्दल मी पूर्णपणे अज्ञानी होते.

उद्या व्हॅलेंटाईन डे असून त्या पार्श्वभूमीवरच चेंज डॉट ओआरजी या वोबसाईटने महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. त्यात सहभागी होताना अनुष्काने सर्व महिलांना या मोहिमते उतरण्याचे आवाहन केले आहे.