औरंगाबाद – न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, मला जास्त दिवस गप्प ठेवता येणार नाही, असे एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी म्हटले आहे. ते खुलताबादेत बोलत होते.

औरंगाबाद – न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, मला जास्त दिवस गप्प ठेवता येणार नाही, असे एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी म्हटले आहे. ते खुलताबादेत बोलत होते.
ओवेसी यांनी खुलताबादेत हजरत बावीस ख्वाजा यांच्या दर्ग्यामध्ये दर्शन घेतले. त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने औरंगाबादमध्ये प्रवेश न करता खुलताबादला जावे लागले आहे. ओवेसींना दोन मार्चपर्यंत औरंगाबादेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
खुलताबादेत दर्गा दर्शनासोबत त्यांच्या गुरूंचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ओवेसींच्या जाहीर सभेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण देत,औरंगाबाद पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती, त्यानंतर ओवेसींना औरंगाबाद शहरात येण्यास बंदीही घालण्यात आली आहे.