चंद्रावरही मिळणार नेटवर्क, नोकियाला मिळाले कंत्राट

फोटो साभार दैनिक भास्कर

चंद्रावर पाहिले सेल्युलर नेटवर्क उभे करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने फिनलंडची कंपनी नोकियाची निवड केली आहे. नासा भविष्यातील वसाहतीच्या दृष्टीने चंद्रावर सेल्युलर नेटवर्क प्रस्थापित करण्याची योजना आखत असून चंद्रावर मानवी वस्ती उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. २०२४ मध्ये माणसाना चंद्रावर नेण्याचे लक्ष्य नासाने आखले आहे. या योजनेला आर्मेटीस प्रोग्राम असे नाव दिले गेले आहे.

नोकियाकडून या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार नासा चंद्रावर माणसाना दीर्घकाळ वास्तव्य करता आले पाहिजे या दृष्टीने प्रयत्नशील आहे. नोकिया अंतराळात पहिली वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टीम २०२० अखेरीपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सुरु करणार आहे. त्यासाठी टेक्सासच्या खासगी स्पेस क्राफ्ट डिझाईन कंपनी इन्टूएटीव्ह मशीन्स बरोबर करार करण्यात आला आहे.

या कंपनीच्या सहकार्याने नोकिया त्यांची उपकरणे चंद्रावर नेणार आहे. तेथे ४ जी/ एलटीई कम्युनिकेशन स्थापन केले जाणार आहे. मात्र अंतिम लक्ष्य ५ जी नेटवर्कचे आहे असा खुलासा केला गेला आहे. नोकियाच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर फोरजी/ एलटीई अतिशय यशस्वी ठरले असून ते विश्वसनीय आहे. यामुळे अंतराळवीर आवाज, व्हिडीओ कम्युनिकेशन करू शकतीलच पण टेलीमेट्री, बायोमेट्रिक डेटा एक्स्चेंज, रोवर व अन्य रोबो डिव्हायसेस अशी जी उपकरणे तैनात असतील ती रिमोटने नियंत्रित करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे.