करोना नियम पालन करणारे आदर्श वृध्द

फोटो साभार भास्कर

जगभर करोना विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणे आणि सोशल डीस्टन्सिंग पाळणे बंधकारक केले असूनही अनेक देशातील नागरिक या नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळते आहे. इटली मधील दोन वृद्ध माणसांनी मात्र या संदर्भात जगापुढे आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे इटलीच्या नॉर्टीसे भागात फक्त हे दोनच नागरिक राहतात. तरीही ते जेव्हा जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा आवर्जून मास्क वापरतात आणि सोशल डीस्टन्सिंगचे काटेखोर पालन करतात.

जीयोवेनी केरीली वय ८२ आणि जीयामपिरो नोबिली वय ७४ या त्या दोन व्यक्ती आहेत. त्यांना कुणाचा शेजार नाही. पण वय जास्त असल्याने त्यांना करोनाचा धोका आहे. इटली मध्ये या भागात करोनाने ३७ हजार लोकांचा जीव गेला आहे. केरीली म्हणतात मी म्हातारा आहे. मला करोनाने मृत्यू यावा असे वाटत नाही. मला करोनाचा संसर्ग झाला तर माझी काळजी घेणारे कुणी नाही. पण मी येथे माझ्या मेंढ्या, फळबागा, मधुमाशी पालन यांची देखभाल करतो. मी दिवसभर मास्क लावतो. इटली मध्ये मास्क न घालणाऱ्याना ४८ हजार ते १.२१ लाख रुपये दंड भरावा लागतो. नियम पाळायला हवाच. आपल्या देशाला लाज येईल असे वर्तन करता कामा नये असे माझे प्रामाणिक मत आहे.

नोबिली ज्युवेलरी तयार करण्याचे काम करतात. ते सांगतात दागिन्याच्या नव्या नव्या डिझाईनच्या कल्पना मला येथील सुंदर निसर्ग आणि जंगलामुळे मिळतात. चांगले वाईट असे काही नसते. पण प्रत्येकाने स्वतःच्या रक्षणाची काळजी घेतली पाहिजे. मला कुणी भेटायला आले तर मी दोन मीटर अंतर ठेऊन त्याना भेटतो. ९० च्या दशकात येथे वारंवार भूकंप झाले त्यामुळे येथील रहिवासी कामाच्या शोधात अन्यत्र गेले आहेत. उन्हाळ्यात काही रहिवासी सुटी साठी येतात. येथे हॉटेल, रेस्टॉरंट, किरणा दुकान, औषधाचे दुकान, डॉक्टर नाही. येथे मी आणि केरिली दोघेच आपापल्या घरात राहतो. पण जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा करोना नियम पाळतो.