
नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी काँग्रेसचे खासदार महाबळ मिश्र आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या विरोधात दिल्ली सत्र न्यायालयाने समन्स जारी केले आहे.

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी काँग्रेसचे खासदार महाबळ मिश्र आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या विरोधात दिल्ली सत्र न्यायालयाने समन्स जारी केले आहे.
एका १६ वर्षीय युवतीने ७ वर्षापूर्वी महाबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपले अपहरण करून त्यांच्याशी संबंधित एका व्यक्तीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. याबाबत तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने दाखल करून सत्र न्यायालयाला हा खटला चालविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सत्र न्यायालयाने महाबळ यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी आणि भाऊ याच्यावर समन्स काढून त्यांना न्यायालयात हजार राहण्याचे आदेश दिले आहेत.
सन २००६ मध्ये महाबळ यांच्या घरात आपल्यावर अत्याचार करण्यात आले आणि महाबळ व कुटुंबियांनी बलात्कारी व्यक्तीबरोबर लग्न करण्याची आपल्यावर जबरदस्ती केली; असा या युवतीचा आरोप आहे.
यापूर्वी सत्र न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी या मुलीच्या युवतीच्या वडिलांची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने मात्र पुर्नविचार याचिका दाखल करून घेऊन सत्र न्यायालयाचे मागचे आदेश रद्दबातल ठरविले आणि खटला पुन्हा चालविण्याचे आदेश दिले.