शकील अहमद यांचा महामूर्खपणा

देशामध्ये आणि विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये मूर्ख नेत्यांची कमतरता नाही, हे सिद्ध करण्यासाठी जे एकेक नेते पुढे सरसावत आहेत त्यामध्ये आता पक्षाचे सरचिटणीस असणार्यां शकील अहमद यांची भर पडली आहे. त्यांनी लालकृष्ण अडवानी यांच्यावर दुगण्या झाडल्या आहेत. गाढवाला यापेक्षा वेगळे काही कामच नसते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते चिडले आहेत खरे, परंतु भाजपाचे नेते शहाणे असतील तर शकील अहमद यांच्यासारख्या मूर्ख माणसाच्या विधानाकडे त्यांनी एक तर दुलर्क्ष तरी केले पाहिजे किवा त्याला न्यायालयात खेचून त्याचा गाढवपणा न्यायालयातच सिद्ध केला पाहिजे.

मात्र अशा लोकांना प्रसिद्धीची फार हाव असते आणि कोणत्याही निमित्ताने का होईना त्यांना पेपरमध्ये नाव आलेले आवडत असते. त्यांना मूर्ख म्हणून कोणी नाव छापले तरी हसूच येते. मूर्ख म्हटल्याचे वाईट वाटत नाही, पण नाव छापून आल्याचा आनंद होतो आणि अशी प्रसिद्धी मिळावी म्हणून मेंदूतल्या सर्वात विकृत कोपर्या्तून ते असा काही तरी नवा शोध लावतात की, माणसाची बुद्धी एवढी वाईट चालू शकते याचे तो शोध ऐकणार्यालला नवल वाटते.

काँग्रेस पक्षाचे एक सरचिटणीस दिग्विजयसिंग हे विकृत विधाने करण्याच्या बाबतीत फार प्रसिद्ध आहेत. त्यांची काही काही विधाने काँग्रेस पक्षाला केवळ अडचणीतच आणतात असे नाही तर काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा त्यांच्या विधानाची किळस येते. सोनिया गांधी, मनमोहनसिग अशा नेत्यांना सुद्धा अशा वाचाळ लोकांना कसे आवरावे असा प्रश्न पडतो. काही वेळा ते फक्त मौन पाळतात. कारण दिग्विजयसिंग किवा शकील अहमद अशा या विकृत बहाद्दरांनी केलेली विधाने काँग्रेस पक्षाच्या फायद्याची असतात. ती विधाने करण्याची भाषा चुकीची असली तरी त्यातला युक्तीवाद काँग्रेसच्या पथ्यावर पडणारा असतो. म्हणून अशी विधाने करणार्यांभच्या बाबतीत हे ज्येष्ठ नेते मौन पाळतात. कधी सुद्धा अशी विधाने करू नयेत, अशी समज त्यांना देत नाहीत.

काँग्रेसच्या पोतडीत जशी शहाणी माणसे आहेत तशी अशी विकृत माणसेसुद्धा आहेत आणि त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला जायचे आहे, अशी काही तरी कल्पना या नेत्यांनी करवून घेतलेली आहे. म्हणून आता शकील अहमद हे पक्षाचे सरचिटणीस असून अशा प्रकारची गरळ ओकतात याबद्दल त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही. फक्त काँग्रेस श्रेष्ठींकडून मौन तेवढे पाळले जाईल.

शकील अहमद यांचा शोध आहे तरी काय? १९४८ सालच्या आधी लालकृष्ण अडवानी पाकिस्तानात होते. ते सिंधी असल्यामुळे सिंध प्रांतात रहात होते. भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान हे मुस्लीम राष्ट्र निर्माण झाले. त्यावेळी पाकिस्तानात जातीयवादी मुस्लिमांनी हिंदूची घरे लुटली, त्यांच्या बायका पळवल्या, अनेकांच्या हत्या केल्या. या दंगलींकडे आणि स्थलांतराकडे जगातले सर्वात मोठे हिसक स्थलांतर म्हणून पाहिले जाते. कित्येक लोकांना आपला जमीन, जुमला, दुकाने, घरे यांचा त्याग करून अंगावरच्या कपड्यानिशी भारताकडे धाव घ्यावी लागली. माणुसकीला काळीमा लावणारे अनेक प्रकार त्यावेळी हिदूंच्या बाबतीत पाकिस्तानात घडले.

अशा या स्थलांतरामध्ये अडवानी, जेठमलानी, आय.के. गुजराल आणि सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिग यांनी भारतात स्थलांतर केले. मात्र शकील अहमद यांना त्या काळातल्या त्या हिंसाचाराची काहीच कल्पना नाही. तिथून भारतात आलेला प्रत्येक माणूस विशेषतः प्रत्येक हिंदू हा केवळ जीव वाचविण्यासाठी भारतात आलेला आहे. मात्र शकील अहमदचा शोध सांगतो की, अडवानी भारतात पंतप्रधान व्हायला आले. त्याकाळी अडवानींचे वय फार तर २०-२२ वर्षे असेल. वयाच्या विसाव्या वर्षी पदवीधर झालेला एक तरुण आपण भारतात जाऊन पंतप्रधान होणार आहोत, अशी कल्पना करू शकतो का? शकील अहमदसारखा डोके ठिकाणावर नसणारा माणूसच असा शोध लावू शकतो.

अडवानी हे पंतप्रधान होण्यासाठी भारतात आले आणि मनमोहनसिंग हे मात्र केवळ निरुपाय म्हणून आले, असे शकील अहमदचे म्हणणे आहे. गुजराल, मनमोहनसिंग, अडवानी यांनी भारतात येताना जणू काही लेखी आश्वासन देऊन प्रवेश केलेला आहे आणि त्यात केवळ अडवानी हेच पंतप्रधान होण्यासाठी आलेले आहेत, असा शकील अहमद यांचा विचित्र आरोप आहे. गमतीची गोष्ट तर ही आहे की, अडवानी भारतामध्ये हिदूंच्या सेवेसाठी आले असे त्यांचे म्हणणे आहे. मग भारतामध्ये हिदूंची सेवा करणे हा काय गुन्हा आहे की काय? शकील अहमद यांच्या दृष्टीने हा गुन्हा आहे.

परंतु मनमोहनसिंग यांच्यासहित पाकिस्तानातल्या लाखो हिदूंना भारतात यावेसे वाटावे अशा हिंसक दंगली करणार्या  पाकिस्तानातल्या त्या दंगेखोरांबद्दल शकील अहमद एका शब्दानेही बोलत नाहीत. त्या दंगली कोणत्या मानवतेच्या सेवेसाठी होत्या हे शकील अहमद सांगू शकतील का? आणि पाकिस्तानातल्या त्या दंगेखोरांनी भारतातल्या मुस्लिमांच्या सेवेसाठी काय केलेले आहे हे शकील अहमद सांगतील का? भारतातील कित्येक मुस्लीम लोक पाकिस्तानात गेले. त्या लोकांना भारतात काही त्रास नव्हता आणि अजूनही नाही. म्हणून तर शाहरूख खान येथे स्वतःला सुरक्षित मानतो आणि शकील अहमद सारख्या मुसलमानांना हिदूंच्या बाबतीत गरळ ओकायची सुद्धा परवानगी मिळते. शकील अहमद यांनी पाकिस्तानात जाऊन हिदूंच्या कल्याणाच्या गोष्टी बोलून दाखवाव्यात, म्हणजे त्यांना अडवानी, मनमोहनसिंग, गुजराल हे पाकिस्तानातून का आले हे कळेल.