नवी दिल्ली- एलपीजी अर्थात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आलेल्या वाढीची झळ कुंभमेळ्यालाही बसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना हे सिलिंडर सवलतीत पुरविण्याचा आदेश पेट्रोलियम मंत्रालयाने काढला आहे.

पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कुंभमेळा भाविकांना दिलासा मिळाला आहे.
सरकारी धोरणानुसार केवळ घरगुती ग्राहकांनाच सवलतीच्या दरात हे सिलिंडर दिले जातात. हॉटेलसारख्या व्यवसायिक ग्राहकांना बाजारभावाने सिलिंडरची खरेदी करावी लागते.