आगरतळा- त्रिपुरातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या आठवड्यात प्रचारासाठी राज्याच्या दौर्यावर जात आहेत.

आगरतळा- त्रिपुरातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या आठवड्यात प्रचारासाठी राज्याच्या दौर्यावर जात आहेत.
त्रिपुरामध्ये 14 फेब्रुवारीला या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग ९ फेबु्वारीला त्रिपुरामध्ये येणार आहेत. धालाई जिल्ह्याच्या अंबासा या मुख्यालयात ते सभा घेतील. त्यानंतर, दुसर्या दिवशी सोनिया आपल्या एक दिवसाच्या धावत्या दौर्यात आगरतळा येथे सभा घेतील.
राहुल यांचे ८ फेबु्वारीला राज्यातील तीन जिल्ह्यांत तीन ठिकाणी सभा घेण्याचे नियोजन आहे.