इस्लामाबाद – पाकिस्तानातील संवेदनशील अशा खैबर-पख्तुनवा प्रांतात आज एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला मशिदीबाहेर उडवून दिले. या हल्ल्यात 22 जण मृत्युमुखी पडले तर इतर 35 हून अधिक जखमी झाले.

इस्लामाबाद – पाकिस्तानातील संवेदनशील अशा खैबर-पख्तुनवा प्रांतात आज एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला मशिदीबाहेर उडवून दिले. या हल्ल्यात 22 जण मृत्युमुखी पडले तर इतर 35 हून अधिक जखमी झाले.
खैबर-पख्तुनवामधील हांगू शहरात पात बाझार येथील मशिदीत प्रार्थना करून भाविक परतत असतानाच हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले, अशी माहिती हांगू जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला. जखमी भाविकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही.