चीनमध्ये पूल कोसळून आठ ठार

बीजिंग – मध्य चीनमध्ये हेनान प्रांतात मियांची येथे आज महामार्गावरील पूल कोसळून आज किमान आठ जण मृत्युमुखी पडले. या पुलावरून जाणार्‍या फटाक्यांनी भरलेल्या एका ट्रकचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली.

चिनी नववर्ष साजरे करण्यासाठी हा ट्रक फटाके घेऊन जात होता. या स्फोटामुळे या पुलाचा सुमारे 80 मीटर लांबीचा भाग कोसळला. त्यामुळे पुलावरून जाणारी अनेक वाहनेही त्यासोबत खाली पडली.

सुरुवातीला या दुर्घटनेत सुमारे 26 जण ठार झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि, नंतर जिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने आठ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली.