करणच्या सिनेमात झळकणार अक्षय

पाहिल्यादाच सिनेअभिनेता अक्षय कुमार निर्माता-दिग्दर्शक करण जौहर यांच्या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ‘आई हेट लव स्टोरीज’ चे दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा करणार आहे.

दोन नायक असलेल्या या सिनेमात अक्षय एक प्रमुख रोल करीत आहे. या सिनेमाची शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार आहे. या सिनेमातील अन्य नायकाची घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाणार आहे. याबाबत बोलताना करण म्हणाला, ‘ या सिनेमाबाबत आताच काही सांगणे कठीण आहे. मात्र एवढे जरूर सांगेन की हा एक मुख्यधाराचा सिनेमा आहे. यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. पुनीत माझ्याकडे ही कहानी घेऊन आला त्यानंतर मी त्वरित अक्षयशी संपर्क साधला. तो पण या सिनेमाचे कथानक ऐकून रोमांचित झाला.’

करणसोबत काम करण्याविषयी अक्षय म्हणाला, ‘ आम्ही दोघेपण महत्वाकांक्षी निर्माते आहोत. दोघांचे लक्ष्य केवळ मनोरंजन करणे हेच आहे. करण आणि मी पण आपल्या वडिलाचे स्वपन या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.’