नवी दिल्ली दि.१६ – प्रवासी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत २० हजार रूपयांपर्यंतची वाढ केली असून ही वाढ आजपासून म्हणजे १६ जानेवारीपासून अमलात येत आहे असे मारूतीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मयंक पारीख यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्याच महिन्यात कंपनीने गाड्यांच्या किमतीत १ ते ३ टक्के वाढ करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. मारूती ८०० पासून इंपोर्टेड किझाशी पर्यंत अनेक प्रकारची मॉडेल्स मारूतीने बाजारात आणली आहेत. त्यांच्या किमती २.०९ लाखांपासून १७.५२ लाखांपर्यंत आहेत. दुसर्याा तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ५.४१ टक्के घट झाली आहे. मणेसर येथील प्रकल्पातील हिंसाचार, गाड्याची रोडावलेली विक्री आणि चलनातील सततच्या चढउतारांचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर होत असल्याने ही दरवाढ आवश्यक ठरली होती असे पारिख यांचे म्हणणे आहे.