फिरकीपटूंना टर्न मिळाला- धोनी

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्‍लंडवर मोठा विजय मिळवता आल्याने टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या काहिसा खुश आहे. त्याने विजयाचे सर्व श्रेय सांघिक कामगिरीला दिले आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे मात्र त्‍याने विशेष कौतुक केले आहे. या मैदानावर फिरकीपटूंना टर्न मिळणार नाही असे वाटत होते. मात्र त्यांना टर्न सुद्धा मिळाला. त्याच्या कामगिरीने मी प्रभावित झालो आहे, असे मत धोनीने व्यक्त केले.

सुरुवातीला काही फलदाजनी निराशा केल्यानंतर इंग्‍लंडवर १२७ धावांनी विजय मिळवल्‍यानंतर त्‍याने टीममधील प्रत्‍येकाचे प्रदर्शन चांगले झाल्‍याचे म्‍हटले आहे. सुरूवात चांगली झाली नव्‍हती. मात्र, युवराज आणि विराट कोहलीने आमच्‍यासाठी मंच तयार केला. इथे सपाट विकेट असल्‍यामुळे फिरकीपटूंना सहाय्य मिळणार नसल्‍याचे आम्‍हाला वाटत होते. पण याठिकाणी मीच चूकलो. आमच्‍या फिरकीपटूंना टर्न मिळाला, टायनी च्नागली कामगिरी केली.

सुरुवातीला आम्‍ही २५० धावांचे लक्ष्‍य ठेवले होते. जेव्‍हा मी आणि रैना खेळत होतो तेव्‍हा आम्‍ही २४० किंवा २५० पर्यंत पोहचण्‍याचा आमचा विचार होता. त्‍यानंतर जेव्‍हा आमचा जम बसला तेव्‍हा प्रत्यक्षात २५ धावा अधिक झाल्या. या दबावामुळे इंग्लंडचा सहज पराभव करता आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment