मेलबर्न: अंतरिक्षात आकाशगंगेच्या केंद्रातून चमकत्या झर्यासारखा दिसणारा उर्जा स्त्रोत खगोल शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. या उर्जा स्त्रोताचा वेग एक हजार किलोमीटर प्रती सेकंद इतका प्रचंड असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

ऑस्ट्रेलिया येथील न्यू साऊथ वेल्स येथील दुर्बिणीतून या उर्जा स्त्रोताचा शोध लागला असून त्याला शास्त्रज्ञांनी अंतराळ ‘गीझर’ असे नाव दिले आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली अणि नेदरलेंडच्या शास्त्रज्ञांनी या उर्जास्त्रोताचा शोध लावला आहे. एका नव्या ताऱ्यापासून ही उर्जा निर्माण होत असल्याचा काही संशोधकांचा दावा आहे; तर काही खगोलतज्ज्ञांच्या मते आकाशगंगेच्या गर्भातून ही उर्जा निर्मिती होत आहे.
या स्त्रोतातून मुक्त होणारी उर्जा ताऱ्यांच्या स्फोटापासून निर्माण होणाऱ्या उर्जेच्या काही लाख पट अधिक असून सध्या तरी या उर्जेची दिशा पृथ्वीकडे नाही; अशी माहिती संशोधकांच्या पथकाचे प्रमुख इटोर केरेटी यांनी दिली.