गुगलच्या सुविधांचा वेग ३० पटीने वाढणार

बंगळूरू: भारतात इंटरनेटचा; विशेषत: यू ट्यूबचा वाढता वापर लक्षात घेऊन गुगल भारतातील सुविधांचा वेग ३० पटीने वाढविणार आहे. त्यामुळे युट्यूबबरोबरच गुगलच्या सर्च इंजिन आणि हेंग आऊट या सुविधाही नेटकरांना अधिक वेगाने प्राप्त होणार आहेत.

भारतात इंटरनेटचा वापर वेगाने वाढत असला तरीही इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा वेग मात्र सुमार आहे. या वेगात भारताचा जगात ११२ व क्रमांक आहे. या अडचणीवर मात करून भारतीय नेटकरांना वेगवान सेवा देण्यासाठी गुगलने सिंगापूर, हॉंगकोंग आणि तैवान येथे नव्याने डेटा सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे गुगलच्या सुविधांचा वेग सध्याच्या वेगापेक्षा तब्बल ३० पटीने वाढणार आहे; असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला.