महाराष्ट्रीय मल्लांनी मॅट्वरील तंत्र आत्मसात करावे: कर्तारसिंग

पुणे: महाराष्ट्रात कुस्तीची दैदिप्यमान परंपरा आणि मोठी गुणवत्ता असूनही महाराष्ट्रातील मल्ल कालानुरूप मातीतील कुस्तीकडून मॅटवरच्या कुस्तीकडे वळले नाहीत. त्यामुळे कुस्तीच्या क्षेत्रात महाराष्ट्राची पीछेहाट झाली अशी खंत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्ल पद्मश्री कर्तारसिंग यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात मॅटवरील कुस्तीला प्रोत्साहन मिळावे; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी कर्तारसिंग येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्राने देशाला खाशाबा जाधव यांच्यासारखा ऑलिम्पिक स्तरावर मैदान मारणारा कुस्तीगिर दिला. आजही महाराष्ट्रात तेवढीच गुणवत्ता असलेले मल्ल आहेत. मात्र येथील मल्लांनी खेळाचे बदलते स्वरूप ओळखले नाही आणि ते मातीतच खेळत राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्ल आंतराराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकले नाहीत; अशी खंत कर्तारसिंग यांनी व्यक्त केली. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रातील मल्लांनी मॅटवर खेळण्याचे तंत्र आत्मसात केल्यास ते देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment