नवी दिल्ली: दिल्लीत चालत्या बसमध्ये तेवीस वर्षीय युवतीवर सहा जणांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणी दिल्ली पोलिस आज न्यायालयात पाच जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपींवर अपहरण, बलात्कार, हत्या, दरोडा असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

मुख्या आरोपपत्र पन्नास पानाचे असून पुरवणी आरोपपत्र सुमारे १ हजार पानांचे आहे. १६ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटेनत संबंधित तरूणीवर सहा जणांनी बलात्कार करून तिला व तिच्या मित्राला बेदम मारहाण करून धावत्या बसबाहेर फेकून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या या युवतीचा सिंगापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
आरोपींवर गँगरेप, खून, अपहरण, क्रिमिनल असॉल्ट, व दरोडा या गुन्ह्यांखाली भारतीय दंड विधान कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर संबंधित तरूणीचा मित्र प्रमुख साक्षीदार म्हणून साक्ष देणार आहे तसेच सिंगापूर येथे या तरूणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांनाही साक्षीदार म्हणून बोलावले जाणार आहे असेही समजते.
या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय दिल्लीतील वकिलांनी घेतल्यामुळे आरोपींच्या वतीने खटला चालविण्यासाठी न्यायालयालांच वकील नियुक्त करावा लागणार आहे.