सन्नीचा देशी लूक

बिग बॉस सीजनच्या ५ व्या भागापासून ते जिस्म-२ पर्यतचे सन्नी लियोनचे ड्रेसिंग लुक सर्वांनी पहिला आहे. मात्र ३१ डिसेबर रोजी सनी वेगळ्याच ड्रेसिंग लुकमध्ये दिसली. देशी आयटम गर्लसारखा सन्नीने गुलाबी रंगाचा घाघरा आणि चोळी घातली होती. तिने यावेळी देशी लुकमध्ये देशी आयटम सॉंग चिकनी चमेली, छुपके अकेली या गाण्यावर डान्स केला. दिल्लीत कडाक्याच्या या थंडीत सन्नीने गरमागरम परफॉर्मेंस करून दिल्लीवाल्याना मात्र चांगलेच खुश केले.

सन्नी लियोनचा हा पहिलाच लाइव डान्स परफॉर्मेंस होता. मात्र पहिल्यांदा सन्नी डान्स परफॉर्मेंस करीत असल्याने उत्साहित होती. ज्यावेळी तिने स्टेजवर येउन डान्स करन्यास सुरुवात केली. त्यावेळी सगळीकडे टाळ्याचा कडकडाट ऐकू येत होता. सन्नीचा हा परफॉर्मेंस पाहून सर्वांनी शिटिया वाजवून तिला प्रोत्सहहित केले. यावेळी सन्नीचे पति डेनियल वेबर सुद्धा उपस्थित होता. डेनियलने सुद्धा यावेळी सन्नीच्या परफॉर्मेंसची तोंडभरून प्रशंसा केली.

सन्नीच्या परफॉर्मेंसला दिल्ली शहरातील दोन हजर पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. यावेळी संपूर्ण हॉल भरला होता. सन्नी लियोनसुद्धा दिल्लीतील नागरिकाचा उत्साह पाहून हैरान झाली होती. सन्नी या लाइव डांस परफॉर्मेंसची तयारी ब-याच दिवसापासून करीत होती. सुरुवातीला ती काहीशी नर्वस वाटत होती मात्र प्रेक्षकानी दिलेला रीस्पोनास पाहून ती जाम खुश झाली. दिल्लीच्या नागरिकासमोर परफॉर्म केल्याने आता तिचा कॉन्फिडन्स मात्र चांगलाच वाढला आहे.

Leave a Comment