कर्नाटकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हसन: शाळेत सहलीला सोडण्यासाठी घेऊन निघालेल्या शेजार्‍यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यात घडली. याच परिसरात काही दिवसापूर्वी एका दलित युवतीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे.

कट्टाया या गावात राहणारी इयत्ता आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी शेजाऱ्याच्या विकृतीची शिकार बनली. या मुलीला दि. १८ डिसेंबर रोजी सहलीला जायचे असल्याने तिच्या आईने तिच्या शेजारी राहणार्या रंगराजू याला गाडीवरून तिला शाळेत सोडण्याची विनंती केली. या मुलीला मोटरसायकलवरून शाळेत घेऊन जात असताना रंगराजूमधील सैतान जागा झाला आणि त्याने निर्जन स्थळी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला न सांगण्याबद्दल त्याने या मुलीला धमकीही दिली.

हे क्रूरकृत्य केल्यानंतर रंगराजू फरार झाला होता. मात्र सोमवारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.