लष्कर, नौदलाची नववर्ष मेजवानी रद्द

नवी दिल्ली: राजधानीत सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या युवतीच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी लष्कर आणि नौदलाने नववर्षानिमित्त मेजवानी आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी संरक्षण दलाच्या विविध आस्थापनांच्या ठिकाणी जंगी मेजवानीचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी बलात्कारपीडीत युवतीच्या मृत्यूमुळे कोणतीही मेजवानी आयोजित करू नये; असे आदेश लष्कर आणि नौदलाच्या वतीने देण्यात आले आहेत.

सोनिया गांधी यांनीही आपण बलात्कार पीडीत युवतीच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये; असे आवाहन कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले आहे.