ही दिवसापूर्वीच दिल्लीतील गैंगरेप प्रकरणामुळे सर्वजन घाबरले आहे. त्यामुळे युवती आणि महिला सुरक्षेच्याबाबतीत खूपच विचार करीत आहेत. यासर्व प्रकारामुळे बॉलीवुड सेलिब्रिटी सुद्धा घाबरून गेल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून बॉलीवुड एक्ट्रेसेस सुद्धा सुरक्षेची काळजी घेत आहेत. काही दिवसापासून बिपाशा बासुचा कोणी तरी अनोळखी व्यक्ती पाठलाग करीत असल्याने सध्या ती काहीसी घाबरली आहे.
अभिनेता सलमान खानच्या बर्थडे पार्टी वेळी याबाबतचा खुलासा खुद्द बिपाशा बासुने केला आहे. बिपाशा मुंबई येथील गोल्ड जिममध्ये गेल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती तिच्याकडे सारखे पाहत होती. किती तरी वेळ ती बिपाशाकडे पाहत असल्याने ती काहीस घाबरली होती. त्यानंतर त्याला धडा शिकवावा या उद्देशाने बिपाशाने जिमच्या सेक्युरिटीला बोलवून घेतले, मात्र तोपर्यंत ती अनोळखी व्यक्ती गायब झाली होती. जिममधील व्यस्थापन सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहे.
मात्र या प्रकारामुळे बिपाशा बासुच्या मनात गेल्या काही दिवसापासून भीती बसली आहे. त्यामुळे नेहमी त्याचाच ती विचार करत आहे. आतापर्यंत तरुणीच्या दृष्टीने सेफ असलेली मुंबईतील सिनेसृष्टी सुद्धा या प्रकारामुळे काहीसी घाबरली आहे. तसे पहिले तर बिपाशा बासु सारख्या सेलिब्रिटीजच्या बाबतीत असा प्रकार घडत असेल तर सर्वसामन्य युवतीच्या सुरक्षेचे काय होणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे.