जॉर्ज बुश (सिनिअर) रुग्णालयात

ह्यूस्टन: अमेरिकेचे माजी राजाध्यक्ष जॉर्ज बुश (सिनिअर) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवसापासून बुश यांचा ताप उतरत नसल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

तीव्र तापाबरोबरच बुश यांना फुप्फुसाचा संसर्ग आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांना रविवारपासून रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

बुश हे सन १९८९ मध्ये अमेरिकेचे ४१ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी १९९२ मध्ये पुन्हा निवडणूक लढविली. मात्र बिल क्लिंटन यांनी त्यांचा पराभव केला. त्यांचे पुत्र जॉर्ज बुश (ज्युनिअर) यांनीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे.