जेम्स ज्युवेलरी निर्यातीत तीव्र घसरण

मुंबई दि. २६- आक्टोबर महिन्यात भारतातून निर्यात केल्या जाणार्याा दागिने व मौल्यवान खड्यांच्या निर्यातीत २० टक्के घट नोंदली गेली असताना नोव्हेंबर महिन्यातही निर्यातीतली ही घसरण कायम राहिली आहे. नोव्हेबंरमध्ये निर्यातीत आणखी ३.७ टक्के घसरण झाली असून आत्तापर्यंत २. ७८ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. गतवर्षी हाच आकडा २.८९ अब्ज डॉलर्स इतका होता असे जेम्स ज्युवेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सध्या यूएस मार्केटमधील मागणीत थोडी सुधारणा दिसत असली तरी युरोपियन मार्केट मात्र अजूनही वीकच आहे व त्याचाच फटका निर्यातील बसला आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. भारताची निर्यात प्रामुख्याने युरोप, यूएस, यूएई व हाँगकाँग या देशात होते. ज्या निर्यातीत घट झाली आहे त्यात सोन्याची वळी आणि नाणी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही घट ३५ टक्के असून त्यापाठोपाठ रंगीत मौल्यवान खड्यांच्या निर्यातीत २१ टक्के घट झाली आहे. सोन्याच्या दागिने निर्यातीत १० टकके घट नोंदविली गेली आहे.

या क्षेत्राने १५ लाख लोकांना रोजगार पुरविला असून जेम्स ज्युवेलरी निर्यातीचा वाटा भारताच्या एकूण निर्यातीत १७ टक्के आहे. २०११-१२ या सालात या क्षेत्राने ४३ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती.