बॉलीवूडमध्ये सहा वर्षापेक्षा अधिक काळ अभिनेत्री कंगना राणावतने काम केले आहे. आता तिचा स्ट्रगल पीरियड संपला आहे. तिने करियरची सुरुवात २००६ मध्ये अनुराग बसुच्या ‘गैंगस्टर’ या सिनेमापासून केली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून तिला इंडस्ट्रीमध्ये काम करताना स्ट्रगल करावा लागत होता. आता तिचा स्ट्रगल पीरियड संपला असून पुन्हा जोमाने ती कामाला लागली आहे.
याबाबत बोलताना कंगना म्हणाली, ‘इंडस्ट्रीमधील आजपर्यतचा माझा सफर चांगला राहीला आहे. तसे पहिले तर मला काही काळ स्ट्रगल ही करावा लागला. आता मात्र मी इंजॉय करीत आहे. सुरुवातीला मी थोडे वेगळे रोल केले. मात्र आता मी तेच रोल करीत असते जे मला पसंत पडतात. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला स्ट्रगल करावे लागते. सुरुवातीला कोणालाच काम मिळत नाही. तर कुणाला त्याला आवडेल असे काम मिळत नाही. मी अशा स्वरूपाचा स्ट्रगल मधून आता बाहेर पडली आहे. ‘गैंगस्टर’ या सिनेमानंतर माजी टाइपकास्ट हरवली होती. मग तो ‘लाइफ इन अ मेट्रो’ अथवा ‘फैशन’ हा सिनेमा असेल. अशा स्वरुपाची सिनेमा करणे मी नंतरच्या काळात टाळले आहे.’
माझी इमेज चेंज करण्यासाठी मी इंडस्ट्रीमधून बराच काळ ब्रेक घेतला होता. मला नेहमीच वाटत होते की, मी काही चागले रोल करू शकते. त्यानंतर मी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘तनु वेड्स मनु’ या सिनेमात काम करण्यची संधी मिळाली. त्यामुळेच आगमी काळात मी निवडक सिनेमात काम करण्याचे ठरविले असल्याचे ही कंगना म्हणाली.