इंडस्ट्रीमध्ये येताना ५०० गाणे घेऊन एन्ट्री केली होती. आता त्याने नव्याने तेवढीच गाने तयार केली आहेत. म्यूजिक डायरेक्टर, सिंगर, ऐक्टर, स्क्रिप्ट राइटर, प्रड्यूसर, लिरिसिस्ट आणि डिस्ट्रिब्यूटर…एवढे रोल एकदाच करणारा हिमेश रेशमिया म्हणतो की, त्याच्यावर देवासह सलमान खानचा हात आहे.
माझ्यावर सलमानचा हात- हिमेश रेशमिया
त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीबाबत बोलताना हिमेश म्हणाला , ‘ मला त्या स्वरुपाची फिलिंग आली होती. त्यामुळे मला म्यूजिक शिवाय अन्य काही करू शकतो असे वाटत होते. मी अभिनय केलेला ‘आपका सुरूर’ हा सिनेमा जबरदस्त हिट ठरला आहे. आता ‘खिलाड़ी ७८६’ ने नवीन सुरुवात केली आहे. मला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. त्यासाठी मी अक्षय कुमारचा ऋणी आहे. त्याने मला ज्यावेळी सिनेमाची स्क्रिप्ट सांगितली, त्यावेळी मी ३० हजार फुट उंच फ्लाइटवर होतो. मला ती स्क्रिप्ट आवडली. त्यमुळेच मी त्यामध्ये ऐक्टिंग सोबतच को-प्रड्यूसर होण्यासाठी राजी झालो.’
इंडस्ट्रीमध्ये सक्सेस ठरण्यासाठी माझ्या पाठीमागे खान फैमिलीचा हात आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यामुळेच मी मोठा झालो आहे. ते इंडस्ट्रीमध्ये माझे मेंटॉर आहेत. मी प्लैनिंगने काम करतो. इंडस्ट्रीमध्ये एंट्री करताना ५०० गाण्याचा स्टॉक माझ्याकडे होता. आता माझे सगळे गाणे हिट झाले आहेत. त्यानंतर मी पुन्हा ब्रेक घेऊन एक वर्षात ५०० गाने लिहले. आता ज्याप्रमाणे ऑफर मिळतील त्याप्रमाणे मी हे गाणे घेऊन तुमच्या समोर येईल असेही हिमेशने सांगितले.
