सलमान खान अभिनीत ‘दबंग-२’ ने शुक्रवारी रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या दोन दिवसातच २१.१० कोटी रुपयाची कमाई या सिनेमाने केली आहे. व्यापार विशेषज्ञोंच्या मते हा सिनेमा लवकरच १०० कोटी रूपया पेक्षाही जास्तीची कमाई करेल असे त्यांना वाटत आहे.
‘दबंग-२’ ची धमाकेदार सुरुवात
मल्टीमीडिया कम्बाइंशी संबधीत असलेले राजेश थडानी यांच्या मते, दबंग-२’ ने रिलीज झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आहे. तर शनिवारी दुस-याच दिवशी १७ कोटी रूपयाची कमाई केली आहे. रविवारी हा सिनेमा हाउसफुल राहिला आहे. ‘दबंग-२’ च्या धमाकेदार सुरुवातीने ‘राउडी राठौर’ या सिनेमाला मागे टाकले आहे. या सिनामाने पहिल्याच दिवशी १५.१० कोटी रूपयाची कमाई केली होती.
‘दबंग-२’ ने अभिनव कश्यपने २०१० साली दिग्दर्शित केलेल्या ‘दबंग’ या सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सलमानचा लहान भाऊ अरबाज खान हा करीत आहे. या सिनेमासाठी ५० कोटी रूपयाची गुतवणूक करण्यात आली आहे. या सिनेमात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका आहे. तर सोनू सूदच्या जागेवर खलनायक म्हणून प्रकाश राज हा भूमिका करीत आहे. ‘दबंग-२’ हा सिनेमा अरबाज खान दिग्दर्शित करीत असलेला पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे हा त्याचा पहिलाच सिनेमा मेगा हिट व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.
