गेल्या काही दिवसापासून सलमानच्या बहुचर्चित ‘कीक’ या सिनेमाची हिरोइन कोण होणार यावरून बरीचसी रस्सीखेच सुरु होती. विशेषता या सिनेमासाठी दीपिका आणि इलियाना डीक्रूज़ या दोघीत स्पर्धा लागली होती. मात्र शेवटी यामध्ये दीपिका यशस्वी ठरली असून सलमान खान सोबत फायनली आता दीपिकाच झळकणार आहे.
एका तेलुगु सिनेमाचा ‘किक’ हा रीमेक आहे. सिनेमाचे डायरेक्टर साजिद नाडियाडवाला या सिनेमासाठी इलियानाला फायनल करण्याच्या विचारात होते. इलियानानेच ऑरिजनल ‘किक’ या सिनेमात तेलुगू स्टार रवि तेजा सोबत लीड रोल केला होता. २००९ साली रिलीज झालेल्या या तेलगु सिनेमाला चांगला प्रतिसाद लाभला होता.
सूत्रोंने दिलेल्या महितीनुसार, सल्लूची पण फर्स्ट चॉइस इलियाना हीच होती. मात्र काही कारणामुळे सलमानला तीला नाही म्हणता येत नव्हते. इलियानाची पीआर स्ट्रैटिजी मुंबईमध्ये झिरो आहे. तिला याठिकाणी कोणी ओळखत ही नाही. तिच्या तुलनेत दीपिकाची फैन्स फ्लोइंग जबरदस्त आहे. त्याशिवाय या सिनेमात स्टट सीन आहेत. दीपिका अथलेटिक्स असून तिचा स्पोर्ट्स बैक ग्राउंड चांगला आहे. त्यामुळे ती या रोलमध्ये फिट बसत होती. त्यामुळे दिपीकाच्या झोळीत हा सिनेमा पडला आहे. गेल्या ब-याच दिवसापासून दीपिकाची सलमान खान सोबत काम करण्याची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली असून पहिल्यांदाच ती सलमान सोबत या सिनेमातून झळकणार आहे.