आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अल्पावधीतच प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री कोंकणा सेन-शर्मा एका मोठ्या ब्रेकनंतर बॉलीवुडमध्ये परतत आहे. एकता कपूरच्या ‘एक थी डायन’ या सिनेमातून ती लवकरच कमबैक करणार आहे. कोकनापण गेल्या काही दिवसापासून चांगल्या रोलच्या प्रतीक्षेत होती. या सिनेमात तिला मनासारखा रोल मिळाल्याने ती काम करण्यासाठी उत्सुक आहे.
आगामी काळात येत असलेल्या एकता कपूरच्या ‘एक थी डायन’ या सिनेमात ती मुख्य रोल करणार आहे. तसे पहिले तर या सिनेमाच्या बाबतीत जास्त काही रिवील करण्यात आलेले नाही. हा सिनेमा जादू-टोन्यावर अधारीत असल्याचे समजते. या सिनेमाची अजून एक महत्वाची बाब म्हणजे या सिनेमाची कहानी कोंकणाचे वडील मुकुल शर्मा यांनी लिहलेल्या पुस्तकावर आधारित आहे. त्यामुळे कोकणाला या सिनेमाबाबत उत्सुकता लागुन राहिली आहे.
या सिनेमाचे डायरेक्टर कन्नन अय्यर यांच्या मते, कोंकणा बंगाली अभिनेत्री असल्यामुळे या सिनेमातील सर्व बाबी सहजपणे समजू शकणार आहे. त्यामुळे तिला तिचा रोल करताना कसलीच अडचण येणार नाही. तिच्याकडून या सिनेमाच्या युनिटला खूप अपेक्षा आहेत. येत्या काळात तिच्या अभिनयच्या जोरावर हा सिनेमा हिट होईल असे वाटते.