
नवी दिल्ली: दिल्लीतील पाशवी सामुहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या दृष्टीने कायद्यात बदल करण्यात येणार आहे. केवळ १५ दिवसात सुधारीत कायद्याचा मसुदा तयार होणार असून तो तातडीने अमलात आणला जाणार आहे. बलात्काराचे खटले लवकर निकाली काढण्यासाठी दहा फास्ट ट्रेक न्यायालये स्थापन करण्यासही गृह विभागाने परवानगी दिली आहे.
