बहुचर्चित ‘दबंग-२’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. हा सिनेमा नुकताच सिनेमाच्या युनिटसह काही वितरकांनी पाहिला आहे. त्यानंतर या मंडळींनी या सिनेमचे तोंड भरून कौतुक केले आहे. हा सिनेमा कसा आहे त्याचा अंदाज २१ डिसेबर रोजी रिलीज झाल्यावर येणार आहे. या सिनेमात करीना कपूरने एक आयटम सॉंग केले आहे. बॉलीवुडमधील स्टार अभिनेत्री करीना कपूर मलाइका अरोरा खानची गेल्या काही दिवसापासून खूप प्रशंसा करीत आहे. या सिनेमातील ‘फेविकोल से’ या गाण्यासाठी मलाइका अरोरा-खानचे तिने आभार देखील मानले आहेत.
अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केल्यानंतर करीनाचे हे पहिलेच आयटम सोंग आहे. या गाण्याची कोरियोग्राफी फराह खान हीने केली आहे. असे असले तरी ‘बेबो’ मात्र या गाण्याची सफलतेसाठी मलाइकाची प्रशंसा करीत आहे. मलाइका हिने ‘दबंग-2’ या सिनेमाची निर्माती केली असून या आयटम सॉंगसाठी तिनेच खूप मेहनत घेतली आहे.
याबाबत बोलताना करीना म्हणाली, ‘ या गाण्याची कोरियाग्राफी फराह खानने केली आहे. मला तिच्यासोबत काम करयला सुद्धा आवडते. मात्र ‘फेविकोल से’ हे गाने करणे हे माझ्यासाठी आव्हनातमक होते. हे गाणे माझ्या जवळील मैत्रिणीने तयार केले होते. या गाण्यासाठी मलाइकाने खूप परिश्रम घेतले आहेत. कास्ट्यूम पासून ते सर्व प्रकारचे काम मलाइकानेच पहिले आहे. त्यामुळे या गाण्याचे सर्व काही श्रेय मलाइकालाच दिले पाहिजे. हे गाणे प्रेक्षकांना आवडणार असल्याने हिट देखील होईल .’