सचिनच्या निवृत्तीबाबत चर्चेला उधाण

नागपूर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची बेट प्रदीर्घ काळ न तळपल्याने त्याच्या निवृत्तीबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा झडत आहेत. त्यातच सचिनची पत्नी अंजली नागपुरात दाखल झाल्याने सचिन लवकरंच निवृत्तीची घोषणा करेल; असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या वृत्ताचा इन्कार केला आहे.

नागपुरात कसोटी सामना सुरू असताना अंजली मधेच नागपुरात दाखल झाल्याने सतत अपयशी ठरत असलेल्या सचिनच्या निवृत्तीच्या चर्चेला उधान आले आहे. कसोटी सामन्यातही त्याचे पदलालित्य उणावल्याचे दिसून आल्याने त्याच्यावरील दबावात भर पडत आहे. मात्र एवढ्या मोठ्या निर्णयाची इतक्यात शक्यता नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. सचिन एकटाच नव्हे; तर अनेक खेळाडू अपयशी ठरत आहेत. त्यामुळे सचिनवर दबाव आणणे अयोग्य आहे; अशी बीसीसीआयची भूमिका आहे. अंजलीने नागपुरात येण्यात काहीच नवीन नाही. भारतातील अनेक दौऱ्यात ती सचिनबरोबर असते; असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

Leave a Comment