नवी दिल्ली दि.११ – भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी इंडियाने त्यांची हचबॅक प्रकारातील ए- स्टार ची लिमिटेड एडिशन आज बाजारात सादर केली असून नेहमीच्या मॉडेलपेक्षा याची किमत १४,९०० रूपयांनी अधिक आहे. मात्र या अधिक किमतीत ग्राहकांना १४ नवी फिचर्स उपलब्ध करून देण्यात आली असून पेट्रोलवर चालणारी ही कार लिटरला १९ किमीचे अॅव्हरेज देते.
कंपनीचे उपाध्यक्ष मनोहर भट याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, तरूणाईला भुरळ घालेल अशी फिचर्स या गाडीत देण्यात आली आहेत. मरगळलेल्या बाजारात थोडी जान यावी आणि एक्साईटमेंट निर्माण व्हावी या उद्देशाने ही लिमिटेड एडिशन कार सादर केली जात आहे. तिचे नामकरण अे -स्टार अॅक्टीव्ह असे करण्यात आले आहे. ज्या मोजक्याच भाग्यवान ग्राहकांकडे ही कार असेल त्यांना तिचा नक्कीच अभिमान वाटेल असा विश्वास आहे. मारूतीच्या सर्व मॉडेल्समध्ये हा ब्रँड सर्वात व्हायब्रंट असल्याचेही भट यांनी सांगितले.