जोधपूर: अभिनेता सलमान खान याला चिंकारा शिकार प्रकरणी ४ एप्रिल पूर्वी न्यायालयासमोर हजार राहण्याचे आदेश जोधपूर न्यायालयाने दिले. त्याच्याबरोबर असलेल्या अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनाही न्यायालयाने समन्स बजावले आहे.

जोधपूर जवळ असलेल्या भवड गावात दि. २६ सप्टेंबर १९९८ रोजी दोन चिंकारा जातीच्या हरणांची शिकार केल्याबद्दल न्यायालयाने सलमानला १ वर्ष कारावासाची शिक्षा १७ फेब्रुवारी २००६ रोजी ठोठावली आहे. तीन दिवस जोधपूरच्या तुरुंगाची हवा खाल्ल्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सलमानला जमीन दिला होता.