२०१२ सालात आर्थिक मंदीच्या संकटाने त्रस्त झालेल्या अनेक कंपन्यांनी आपले खर्च कमी करण्यासाठी या वर्षात जगभरात मोठ्या प्रमाणावर नोकर कपातीचे धोरण अंगीकारले असून त्यात १० नामवंत कंपन्यांनी तब्बल १ लाख नोकर कपात केली असल्याचे जाहीर केले आहे. २०१२ च्या सुरवातीपासूनच ही कपात केली जात आहे. या कंपन्यांनी मोठे ले ऑफ जाहीर केले असून त्यात एचपी, गुगल, सिटी ग्रूप या कंपन्यांचाही समावेश आहे. पेप्सिको, मेटलाईफ, हेास्टेस ब्रँड, पी अॅन्ड जी, मॉर्गन स्टॅनले या नोकर कपात करणार्याा अन्य कांही महत्त्वाच्या कंपन्या आहेत.
टॉप टेन कंपन्यांची १ लाख नोकर कपात
हेलवर्ट पॅकार्ड म्हणजेच एच पी या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचा नोकरकपातीत प्रथम क्रमांक असून त्यांनी २७ हजार नोकरांना कमी करून ३.५ अब्ज डॉलर्स इतका खर्च कमी केला आहे. होस्टेस ब्रँडने १८५०० नोकर कपात केली आहे तर पेप्सिको आणि पी अॅन्ड जीने अनुक्रमे ८७०० व ४१०० नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्याची कार्यवाही सुरू केली आहे.
सिटी ग्रूपने जगभरात ११ हजार नोकर क मी कले आहेत तर गुगल या इंटरनेट जायंट कंपनीने ऑगस्टमध्येच ४००० नोकर कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. गुगलने केलेल्या नोकरकपातीत २/३ हिस्सा हा अमेरिकेबाहेरच्या देशातील कर्मचार्यां्चा आहे असेही सांगण्यात आले आहे.
