सलग दुस-या कसोटीत भारताचा पराभव

कोलकाता कसोटीमध्‍ये इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. भारताने दिलेले अवघे ४१ धावाचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचे तीन फलंदाज झटपट बाद करुन भारतीय संघ चमत्‍कार घडवितो का, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र ही अशा फोल ठरली. इयान बेलच्या २८ धावाच्या मदतीने त्यानी हे आव्हान पूर्ण केले. इंग्लडने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

रविवारी सकाळी सामना सुरु झाला तेंव्हा टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या काही मिनिटातच २४७ धावांमध्‍ये आटोपला. जेम्स अंडरसनने ओझाचा त्रिफळा उडविला. भारतीय संघाकडून जिगरबाज खेळी करणा-या आर. अश्विनचे शतक मात्र केवळ ९ धावने हुकले. तो ९१ धावांवर नाबाद राहिला. भारताने दिलेले अवघे ४१ धावाचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची अवस्था भारतीय गोलदाजानी दैनीय केली होती.

पहिल्या डावात शतक झळकाविनारा कर्णधार एलिस्‍टर कुक अवघ्‍या एका धावेवर बाद झाला. आर. अश्विनला मोठा फटका मारण्‍याच्‍या प्रयत्‍नात तो यष्टिचित झाला. तर ओझाने जॉनथन ट्रॉटला ओझाने पायचित केले. त्‍यानंतर केविन पीटरसनही शुन्‍यावर बाद झाला. अश्विनच्‍या गोलंदाजीवर त्‍याच्‍या बॅटची कड घेऊन चेंडु धोनीच्‍या हातात विसावला. अश्विनची ही दुसरी विकेट होती. लगेचच तीन फलंदाज बाद झाल्याने इंग्लंडच्या संघात शांतता पसरली होती. मात्र त्यानंतर संयमी फलंदाजी करणा-या इयान बेलच्या २८ धावाच्या मदतीने त्यानी भारताचे हे आव्हान पूर्ण केले. सलग दुस-या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. हा सामना जिंकताना इंग्लडने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

Leave a Comment