गेल्या काही दिवसापासून अभिनेतरी दीपिका पदुकोनची आता नवीन ओळख झाली आहे. तिने ‘कॉकटेल’ या सिनेमात वेरेनिका नावाच्या युवतीचा रोल केला आहे. त्यामुळे आता तिला सर्वत्र वेरीनिका या नावाने ओळखले जात आहे. ती कुठेही जर गेली तर तिचे चाहते तिला वेरेनिका या नावाने हाक मारीत आहेत. या तिच्या नवीन नावामुळे दीपिका सुद्धा आश्चर्यचकित झाली आहे.
दीपिकाची आता नवीन ओळख
दीपिका काही दिवसापूर्वी एका रेस्टोरेंट मध्ये गेली होती. त्याठिकाणी लहान मुलासाहित सर्वजण वेरोनिका या नावाने तिला बोलवत होते. हे पाहून दीपिका काही काळ बुचकळ्यात पडली होती. कारण की तिने कॉकटेल या सिनेमात केलेली वेरोनिकाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. दीपिकाची नेहमीच तिची ओळख तिच्या रोलमुले होते. यापूर्वी ‘ओम शांति ओम’ या सिनेमातील शांतिप्रियाचा रोल असो अथवा ‘लव आजकल’ या सिनेमातील मीराचा रोल आजसुद्धा प्रेक्षकांना आठवणीत आहे.
तिचा प्रत्येक रोल हा चाहत्याना आवडतो. वेरोनिकाच्या रोलच्या माध्यमातून मात्र तिने कमाल केली आहे. या रोल साठी तिला जर आगामी काळात सर्वश्रेष्ठ अभिनेत्री हा किताब मिळाला तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. तिच्या साठी वेरोनिकाचा रोल हा आव्हानातामक असा होता.तिच्यासाठी नव्हे तर अन्य अभिनेत्रीसाठी सुद्धा हा रोल अवघडच होता. मात्र दीपिकाने हे आव्हान स्वीकारले आणि वेरोनिकाच्या रोलला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. एवढे मात्र नक्कीच ‘कॉकटेल’ मुळे दीपिकाच्या प्रशंसकाची संख्या मात्र वाढली आहे.
