गेल्या काही दिवसापासून सलमान खान व प्रियंका चोप्रा यांनी दुबईमधील एका इवेंटमध्ये सोबत पर्मरफॉ केला होता. तेंव्हा पासून दोघेजण खूप खूप जवळ आली असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आगामी काळात सलमानने प्रियंकाला सोबत घेऊन नवीन सिनेमा तयार करण्याची प्लैनिंग तो करीत असल्याचे समजते. काही दिवसापूर्वी तर प्रियंका चोप्रा किंग खान शाहरुखच्या खूपच क्लोज होती, याची कबुली शाहरुखने दिली होती. मात्र आता सलमानने मीच प्रियंकाचा फेवरिट असल्याचे म्हणून नवीन वाद उपस्थित केला आहे.
मीच प्रियंकाचा फेवरिट- सलमान
गेल्या काही दिवसापासूनच प्रियंका सलमानच्या खूपच जवळ येत असल्याची बॉलीवूडमध्ये चर्चा होती. मात्र दुबईमधील कार्यक्रमानंतर ही बाब आता प्रूव झाली आहे. दोघेजन एका इवेंटसाठी दुबईला गेले होते. याठिकाणी दोघांनी एकत्रित परफॉर्म सदर केला होता. या इवेंटनंतर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंसवेळी दोघाची ट्यूनिंग चांगलीच जमली होती. दोघे पण एका पेपरमधील कार्टूनला पाहून जोरात हसत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सलमानने प्रियंकाही त्याची फेवरीट को-स्टार असल्याचे कबूल केले. एवदेच नव्हे तर मीच तिचा फेवरीट असल्याचे सांगून टाकले.
या इवेंटवेळी जरीन खान आणि सोफी चौधरीपण त्यांच्या सोबत उपस्थित होते. प्रियंकाने पण यावेळी सलमान सोबत तिची चांगली दोस्ती असल्याचे सांगून टाकले. त्याशिवाय तिने यावेळी सलमानचे तोंड भरून कौतूक देखील केले. प्रियंकाने सलमान सोबत बॉन्डिंग केल्याने त्याचा तिला फायदा देखील झाला आहे. नुकतीच दुबई मध्ये सलमान, सुहेल, प्रियंका आणि त्यांच्या मैनेजरमध्ये मीटिंग झाली. त्यामध्ये लवकरच सल्लू-प्रियंकाला सोबत घेऊन सिनेमा निर्मितीचा प्लैनिंग करीत असल्यचे समजते. आता या दोघाच्या सिनेमासाठी मात्र काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.
