गेल्या काही दिवसापासून लग्नानंतर करीना कपूर सिनेमामध्ये लगेचच परतणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. असे असताना बेबोने मात्र सर्वानाच हैरान केले असून लग्नानंतर काही दिवसातच तिने ‘दबंग -२ ‘ सिनेमामधील आयटम नंबर ‘फेविकॉल’ची शूटिंग लगेचच पूर्ण केले आहे. त्यानंतर लगेचच करीनाने तिच्या करियरवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तिने दिग्दर्शक करण जोहरचा सिनेमा साइन केला आहे. या सिनेमात ती आता इमरान खानसोबत झळकणार असल्याचे समजते.
इमरान खानसोबत झळकणार करीना
काही दिवसापुर्वीच तिने दिग्दर्शक प्रकाश झाचा सिनेमा साइन केला होता. मात्र सिनेमाचे शूट सुरु होण्यास अजून वेळ असल्याने तिने तोपर्यंत तिने दिग्दर्शक करण जौहरचा सिनेमा साइन केला आहे. यास सिनेमात ती अभिनेता इमरान खानच्या ऑपज़िट काम करणार असल्याचे समजते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार करीनाला लग्नानंतर हाच सिनेमा पाहिल्यांदा रिलीज व्हावा असे वाटत आहे. लग्नापूर्वीच करीनाने प्रकाश झाचा ‘सत्याग्रह’ हा सिनेमा साइन केला होता. ज्यामध्ये ती एक टीवी जर्नलिस्टचा रोल करीत आहे. या सिनेमाची शूटिंग जानेवारी महिन्यात भोपालमध्ये शूट होणार आहे. मात्र आता करीना जानेवारी महिन्याच्यापूर्वीच करणच्या सिनेमाचे शूट सुरु करणार आहे.
करीनाने हा निर्णय तिच्या करियरच्या दृष्टीने घेतला आहे. ‘सत्याग्रह’ एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. ज्यामध्ये करीनासोबत अमिताभ बच्चन, अजय देवगन, मनोज वाजपेयी आणि अर्जुन रामपाल असे मोठे स्टार्स काम करीत आहेत. करणचा सिनेमा हा सोलो हीरो सिनेमा आहे. त्यामध्ये करीना लीड रोल करता आहे. त्यामुळेच तिने करणच्या या सिनेमाला प्रायॉरिटी दिली असल्याची माहिती सूत्राने दिली.
