पहिल्या दिवशी ‘तलाश’ ची कमाई १५ कोटी

अमीर खान व करीना कपूरच्या बहुचर्चित ‘तलाश’ या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला, मात्र त्यादिवशी कसलीच सुट्टी नसताना ‘तलाश’ या सिनेमाने एवढी मोठी कमाई केली आहे. त्यामुळे आगामी काळात हा सिनेमा चांगली कमाई करील असा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे.

यापूर्वीचा इतिहास पहिला तर रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ‘राज’ १०.५० कोटी, तर अभिषेक बच्चनच्या ‘बोल बच्चन’ ने ११.७५ कोटी रुपये तर कॉकटेलने १०.७५ कोटी तर राजनीतिने १०.५० कोटी आणि बर्फी या सिनेमाने ८.५ कोटी रुपये कमविले आहेत. या सर्व सिनेमाना कमाईच्या बाबतीत तलाशने मागे टाकले आहे.

‘मिस्‍टर परफेक्‍शनिस्‍ट’ असलेल्या अमिर खानचे बॉलीवूडमध्ये चांगलेच वजन असल्याने ‘तलाश’ या सिनेमाच्या प्रीमयरसाठी सिनेसृष्टीतील नामवंत मंडळीनी हजेरी लावला होती. त्यामुळे हा सिनेमा हिट होईल असा कयास त्यावेळेसपासून व्यक्त केला जात होता. तर दुसरीकडे या सिनेमाची हिरोइन करीना कपूर मात्र या आयोजित करण्यात आलेल्या प्रीमयरसाठी उपस्थित न राहिल्याने सर्वत्र वेगळ्याच अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याचा काही परिणाम सिनेमा रिलीज झाल्यानंतर होईल का असे वाटत होते, मात्र तसे काही घडले नाही.