मलाच सलमानसोबत लग्न करावे लागेल- राणी

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये लग्नाचा मौसम जोरात सुरु आहे. त्यामुळे आता सर्वत्र लग्नाच्या विषयावर जोरात चर्चा सुरु आहे. खंडाला गर्ल म्हणून चर्चेत आलेली अभिनेत्री राणी मुखर्जी डायरेक्टर आदित्य चोप्रा सोबत लवकरच लग्न करणार अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून राणी व सलमान खान दोघेही लग्नाच्या चर्चेने मिडियामध्ये चर्चेचा विषय आहेत. त्यामुळे एका इंटरव्यूवमध्ये राणीला लग्नाबाबत विचारले असता ती हसत -हसत म्हणाली की, सर्वांचे बोलणे बंद करावयाचे असेल तर मलाच आता सलमान खानसोबत लग्न करावे लागणार आहे.

याबाबत अधिक बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, ‘ मी आगामी काळात बॉलीवूडमधील मोस्ट एलिजबल बैचलर असलेल्या सलमानची भेट घेऊन तो लग्न केंव्हा करणार आहे याची विचरणा करणार आहे. मी सुद्धा मिडीयाच्या या सतत विचारल्या जाण-या प्रश्नामुळे आता मात्र वैतागले आहे. त्यामुळे या प्रश्नापासून सुट्टी मिळवण्याची असेल तर लग्न करणेच हा त्याच्यावर पर्याय आहे.’

चेष्टे- चेष्टेत तरी राणीने लग्न करायला उशीर होत असल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या पेक्षा वयाने कमी असलेली बॉलीवूडमधील मंडळी लग्न करीत असल्याने आता राणी व सलमानने लग्नाच्या बाबतीत खरेच सिरीयस होण्याची गरज आहे.

Leave a Comment