टीवीवरील रियलिटी शो ‘सच का सामना’ मध्ये होस्टचे काम केलेला राजीव खंडेलवाल आता मोठ्या पडद्यावरील ‘टेबल नं. २१’ या सिनेमातून झळकणार आहे. ‘सच का सामना’ या टीवीवरील रियलिटी शो मध्ये होस्ट म्हणून काम करीत असतना त्याने अनेका पार्टिसिपेंटची सुट्टी केली होती. आता येत असलेल्या या सिनेमाच्या माध्यमातून त्यालाच आता चक्रव्युवात अडकलेल्या पार्टिसिपेंटची भूमिका कारावी लागणार आहे.
या रोल बाबत बोलताना राजीव खंडेलवाल म्हणाला, ‘ या बहुचर्चित सिनेमासाठी मी सुरुवातीला कित्येक वर्कशॉप अटैंड केले आहेत. विशेष करून सही लुक दिसून येण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. त्याशिवाय मी या रोलसाठी तीन किलो वजन कमी केले आहे. कुठल्याही सीटवर बसने मुश्कील असते.’ सच का सामना’ वेळी मी दावा करीत होतो की या सीटवर बसणे सोपे काम नाही. मात्र त्यावेळी जे लोक या सीट वर बसून प्रश्नाची उत्तरे दिली, त्यांच्या धाडसाचे मी कौतुक करतो.’
काही दिवसापुर्वी मला ‘ओ माय गॉड’ या सिनेमाची ऑफर आली होती. स्क्रिप्ट पण चांगली होती मात्र कैरेक्टर चैलेंजिंग असल्याने मी हा रोल केला नाही. ‘टेबल नं. २१’ या सिनेमाची स्क्रिप्ट मला खूपच आवडली. त्याशिवाय मला परेश रावल सोबत काम करता येणार असल्याने व सिनेमाचे प्रोड्यूसर इरोज इंटरनेशनल सोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मी हा सिनेमा स्वीकरला असल्याचेही राजीवने सांगितले.