रणबीर कपूर आणि कैटरीना कैफ हे जरी प्रेक्षकापासून खूप काही जरी लपून ठेवत असले तरी ते काही ना काही निमित्त साधून एकत्रित येत असल्याची खबर मात्र आता सर्वानाच लागली आहे. ते जरी काहीच बोलत नसले तरी त्यांची मूवी डेट्स खूप काही सांगून जाते. काही दिवसापूर्वीच हे दोघेजन मिळून ‘स्काईफॉल’ हा सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. त्या निमिताने दोघानी एकत्रित ‘लाइफ ऑफ पाइ’ इंजॉय केला. कैटसोबतच्या मूवी आउटिंगसाठी रणबीरने खूप गुप्तता पाळली होती. त्यामुळे ते जरी सर्वाना हुलकावणी देण्यात यशस्वी झाले असले तरी ते याठीकानाहून निघून गेल्यानंतरची खबर सर्वाना माहित पडली.
कैटरीना- रणबीरने दिली हुलकावणी
या दोन्ही ऐक्टर्सने सांयकाळी ५.३० च्या शोचा प्लान केला होता. सिनेमासाठी आलेल्या गर्दीला अवॉइड करण्यासाठी दोघेजण सिनेमा सुरु झाल्यानंतर १० मिनटे उशिरा त्यठिकाणी पोहचले. इंटरवेलमध्ये पण हे दोघेजण सीटवरच बसून होते. मात्र दोघेजण मिळून सिनेमा पहात असल्याची चाहूल प्रेक्षकांना लागली असल्याची खबर रणबीरला मिळाली. त्यामुळे सिनेमा संपण्यापूर्वी ५ मिनट अगोदरच कैट सोबत रणबीर मेन एग्ज़िट ऐवजी दुस-या एग्ज़िटमधून निसटला.
त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, रणबीरने यावेळी लगेचच हलचाल करून याठिकाणी गर्दी एकत्रित होण्याअधीच कैटरीनाला सोबत घेऊन पळ काढला. त्यांची टायमिंग जबरदस्त असल्यामुळे हे सर्व शक्य झाले.
