रिकी पाँटिंगचा कसोटी क्रिकेटला बाय बाय

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची कामगिरी खराब होत असल्याचे कारण सांगून पाँटिंगने त्याच्या १७ वर्षाच्या कारकिर्दीनंतर कसोटी क्रिकेटला बाय बाय केला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. पाँटिंगला तिस-या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आले असल्याने त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असलायचे समजते. त्याने कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली असली तरी स्थानिक क्रिकेट, प्रथम श्रेणी व लीग क्रिकेट सामने खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

गेल्या एक वर्षापासून कामगिरी खराब होत आहे. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत माझी कामगिरी खराब झाली आहे. म्हणूनच मी क्रिकेटमधून निवृत्त होण्यचा निर्णय घेत आहे. यासाठी माझ्यावर निवड समितीने कुठलाही दबाव टाकला नसल्याचे रिकीने स्पष्ट केले आहे. १६७ कसोटी सामने खेळलेला पाँटिंग आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात अपयशी ठरला होता. दोन दिवसापुर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी पाँटिंग संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असून, इंग्लंडविरुद्ध होणा-या ऍशेस मालिकेसाठी तो हवा असल्याचे म्हटले होते. तरीही रिकीने आपला निर्णय जाहीर केला.

पाँटिंगने १६७ कसोटी सामने खेळताना ४१ शतक व ६२ अर्धशतकाच्या जोरावर १३ हजार ३६६ धावा केल्या होत्या. तर, ३७५ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ३० शतक व ८२ अर्धशतकाच्या जोरावर १३ हजार ७०४ धावा केल्या होत्या. त्याशिवाय १७ टी-२० सामनेही खेळला आहे. विशेष म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली टीम ऑस्ट्रेलियाने दोनदा विश्वचषक जिंकला होता.

Leave a Comment