गेल्या काही दिवसापासून अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांनी एकत्रित काम केलेले नाही. साउथचा ‘वेत्तै’ या सिनेमाचा रिमेक येत असून त्यामध्ये पुन्हा हे दोघे जन एकत्रित दिसणार आहेत. याबाबत सोर्सने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाची शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार असल्याचे समजते.
सुरुवातीला या सिनेमासाठी शाहिद कपूरला अप्रोच करण्यात आले होते. मात्र त्याच्यासोबत या सिनेमाची सेटिंग जमलेली नाही. त्यानंतर या सिनेमासाठी आर. माधवन आणि अली जाफर यांची जोडी ठरविण्यात आले होती. काही कारणामुळे त्याच्यासोबत ही जमले नाही. त्यामध्येच या सिनेमाच्या डायरेक्शनची कमांड अब्बास-मस्तानच्या हाती आली आहे. त्यामुळे सध्या त्यांनी अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्याशी संपर्क साधला आहे.
प्रॉडक्शन हाउस सध्या या ‘दोस्ताना’ च्या जोडीशी बातचीत करीत आहे. त्यांचे यापूर्वीचे रेकॉर्ड पाहता ही जोडी फीट मानली जात आहे. तसे पाहिले तर आतापर्यंत ‘दोस्ताना’ च्या सीक्वलबाबत अजून काहीही ठरलेले नाही. आजपर्यतचा या जोडीचा सक्सेस रेट पाहता दोघेही सिनेमात काम करणे फिक्स करतील असा कयास आहे. अभिषेक-जॉन सोबत सध्या चर्चा सुरु असून काम पुढे सरकले की नाही याबाबत अजून तरी काही कल्पना नाही.