चेन्नई दि. १७ – फ्रेंच कारमेकर कंपनी रेनॉल्टने त्यांच्या नव्यानेच बाजारात दाखल झालेल्या आणि अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या डस्टर या एसयूव्हीची यूके ला या महिनाअखेर निर्यात सुरू करण्याचे ठरविले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मार्क नसीफ याविषयी माहिती देताना म्हणाले की डस्टरने भारतीय बाजारपेठेत अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली असून आक्टोबर महिन्यात कंपनीने विकलेल्या ६७९० वाहनांत डस्टरची संख्या ५४०६ इतकी आहे. ही गाडी लाँच केल्यापासून प्रथमच इतकी मोठी विक्री झाली आहे. त्यामुळे आता बाहेरच्या बाजारपेठा ट्राय करण्याचा कंपनीचा विचार असून प्रथम यूकेला निर्यात सुरू करण्यात येत आहे. अर्थात वाहनांचे उत्पादन चेन्नईतील प्रकल्पातच होणार आहे मात्र निर्यात करण्यात येणारे मॉडेल येथल्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
यूके नंतर कंपनी पश्चिम आणि दक्षिण आफ्रिका, तसेच मलेशिया आणि इंडोनेशिया येथेही गाड्या निर्यात करणार आहे. मात्र कारसाठी मुख्य बाजारपेठ भारताचीच आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.