शाहरुख- कैटरीनामधील जवळीकता वाढली

‘जब तक है जान’ च्या प्रमोशनसाठी गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडचा किंग शाहरुख आणि चिकनी चमेली कैटरीना कैफ भारतातील कित्येक शहरात फिरले. त्यांचा सिनेमा सिल्वर स्क्रीनवर रिलीज झाला असून सध्या त्याला जबरदस्त रिस्पोंस मिळत आहे. त्यामुळे दोघेही सध्या जाम खुश आहेत. हे सगळे झाले तरी शाहरुख आणि कैटरीना दोघेही एकमेकाना सोडण्यास तयार नाहीत. दोनच दिवसापूर्वी दोघेही मध्यरात्री मुंबई एयरपोर्टवर फिरताना दिसले. त्यामुळे बॉलीवूडमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासर्व प्रकारामुळे तिकडे सलमान मात्र जाम वैतगला असणार आहे.

‘जब तक है जान’ या सिनेमाचे प्रमोशन आता बंद झाले आहे. त्यामुळे शाहरुख आणि कैटरीना सध्या एकत्र का फिरत असतील असा प्रश्न सध्या सर्वाना पडला आहे. सध्यपरीस्थित ही जोडी अजूनही एकत्र फिरताना दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्री हे दोघेजण मुंबईच्या एयरपोर्टवर सोबत फिरताना दिसले. हे दोघे एकत्र दिसल्यानंतर काही जणांनी त्यांचे फोटो देखील काढले आहेत.

सध्या सर्वत्र कैटरीना आणि शाहरुख यांची वाढती जवळीकता बॉलीवूड मध्ये चर्चेचा विषय झाली आहे. प्रमोशनचे काम संपल्यानंतर ही हे दोघे एकत्र का फिरत आहेत असा सवाल काही जणांना अजुनही भेडसावत आहे. कैटरीनचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या सलमानला अजूनही कोणी कैटरीनाशी सलगी केलेली आवडत नाही, तरीपण अजूनही सल्लूमियां गप्प कसा आहे हे समजत नाही.