लंडन दि. १६ – आफ्रिकेतील सवानाच्या मैदानात फिरणारे आदिमानव ३५ लाख वर्षांपूर्वी गवत खात होते. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या एका संशोधनात ही माहिती पुढे आली आहे. सुरूवातीचा माणूस चिंपैंजीप्रमाणे कंदमूळ आणि फळ खात नव्हता. तो जेवण म्हणून हिरवे गवत खात असे. सूत्रांनुसार चाड येथे मिळालेल्या वनमानवासारखा दिसणारा एका जीवाश्माचे दातात साठलेल्या कार्बनचे विश्लेषण केल्यानंतर संशोधक या निष्कर्षावर पोहोचले आहेत.
३५ लाख वर्षांपूर्वीचा माणूस खात असे गवत
संशोधकानी जबड्यात अडकलेल्या अन्नाचे कण काढण्यासाठी लेजरचा उपयोग केला. त्यावेळच्या मानवाच्या वैज्ञानिकांनी काढलेल्या तयार चित्रानुसार या मानवाचे जबडे मजबूत होते. मात्र ते आधुनिक मानवांच्या जबड्यापेक्षा छोटे होते. संपूर्णपणे गवतावर अवलंबून असल्याने हा मानव पूर्णतः शाकाहारी होता.
