स्फिंकस आणि पिरॅमिड नष्ट करण्याचा तालिबानी आदेश

कैरो दि.१४ – होस्नी मुबारक यांच्या कार्यकाळात दोन वेळा हिसाचार माजविल्याच्या आरोपावरून तुरुंगवास भोगलेला मुर्गन सलेम अल गोहरी याने इजिप्तमधील प्राचीन अवशेष असलेले पिरॅमिडस आणि स्फिंक्स नष्ट करण्यासाठी सर्व मुस्लीमांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तालिबानशी संबंध असलेला गोहरी याच्या मते असली प्रतीके नष्ट करावी अशी शिकवण इस्लाम देतो व त्यातूनच अफगाणिस्तानातही तालिबानी राजवटीत बुद्धाचे पुतळे नष्ट केले गेले आहेत. हे काम तेथील सरकार करू शकले नव्हते असेही त्याचे म्हणणे आहे.

टयूनिशियाचे उपाध्यक्ष शेख अबडेल फताब मोरो यांनी मोहम्मद प्रेषितानेही फक्त पूजा अर्चा होणार्याा मूर्ती नष्ट करण्याचे आदेश दिले होते मात्र इजिप्तमधील स्फिंक्स आणि पिरॅमिडच्या पूजा होत नाहीत तेव्हा इस्लामची शिकवण देणारा गोहरी कोण असा सवाल केला आहे. अम्र इव अल आस या ऐतिहासिक लष्करी कमांडरनेही इजिप्त जिंकल्यावर स्फिंक्स आणि पिरॅमिड नष्ट केले नव्हते असेही ते यावेळी म्हणाले.