‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जब तक है जान’ मध्ये गेल्या तीन दिवसापासून जंग सुरु आहे. दोन्ही सिनेमाचे कलेक्शन त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त राहिले आहे. तसे पहिले तर ‘सरदार’ चे कलेक्शन ‘जान’ पेक्षा कमी आहे. सध्या अजय देवगन खुश असून, कमी थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज होऊनही शाहरुखच्या सिनेमाला त्याचा सिनेमा टक्कर देत आहे.
इंडस्ट्रीमधील काहीजनच्या मते, हे दोन्ही पण सिनेमा लवकरच १०० कोटीच्या क्लबमध्ये एंट्री करतील. आता फक्त हे रेकॉर्ड किती दिवसात तुटेल हे पाहण्याची गरज आहे. मल्टिप्लेक्स ग्रुप वेबचे सीईओ राजीव कुमार यांच्या मते , ‘ सुरुवातीच्या चार पाच दिवसात दोन्ही सिनेमे कोटीचा आकडा क्रॉस क तील, तसे पहिले तर, वीकएंडचा फायदा मिळाल्यानंतर दोन्ही सिनेमाचे कलेक्शन १०० कोटी होईल असे वाटते.’
येत्या शुक्रवारी नवीन सिनेमा रिलीज होत नसल्याचा फायदा ‘जान’ आणि ‘सरदार’ ला मिळणार आहे. त्यामुळे शाहरुख च्या सिनेमाचे कलेक्शन १०-१२ दिवसात १५० ते २०० कोटी होऊ शकतो. तर ‘सन ऑफ सरदार’ चे डायरेक्टर अश्विनी धीर यांच्या मते , त्यंच्या सिनेमाची डिमांड वाढली आहे. अश्विनी म्हणाले, ‘ आमचा सिनेमा सिंगल स्क्रीनवर जबरदस्त हिट ठरला आहे. यूपी,राजस्थान, दिल्ली, बिहार आणि पंजाब मधील काही सिंगल स्क्रीन सिनेमाच्या मालकांनी पुढच्या आठवड्यात ‘सन ऑफ सरदार’ ला थिएटर उपलब्ध करून देण्यसाठी अप्रोच केला आहे. साठ ते ऐंशी सिंगल स्क्रीनवर आमचा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचे टोटल कलेक्शन १५० कोटी पर्यंत पोहचेल. ‘
तसे पहिले तर अजय आणि शाहरुखच्या भांडणाचा फायदा सलमान खानला झाला आहे. सल्लूने अजयला एसआरकेच्या ऑपज़िट उभे करण्यचा डाव यशस्वी झाला आहे. सल्लूला ‘जब तक है जान’ त्याच्या ‘एक था टाइगर’ सिनेमाप्रमाने २०० कोटीच्या क्लबमध्ये एंट्री करू नये असे वाटत होते. त्यामुळे ‘जान’ ला ‘सरदार’ च्या पुढे २०० कोटीचा आकडा पार करने अवघड आहे. जंगमध्ये ‘जान’ ने ‘सरदार’ ला मागे टाकले आहे. सल्लूने मात्र एसआरकेवर मात केली आहे.